श्री शारदा समाज सेवा मंडळाची दिनदर्शिका प्रकाशित करण्याची कित्येक वर्षांची परंपरा आहे. गेली दोन वर्षे मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही दिनदर्शिका प्रकाशित करणे शक्य झाले नव्हते. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन जनजीवन सुरळीत झाल्यामुळे ही दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. सांगण्यास आनंद होतो की त्यासाठी आम्हाला तुरंबवकरांकडून उत्स्फूर्त प्रतीसाद मिळाला.
या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा दिनांक ०४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता पुढील ठिकाणी आयोजित केला आहे:
प्राध्यापक सुरेन्द्र गावस्कर सभागृह
२ रा माळा, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
शारदा सिनेमा चित्रपटगहृ जवळ
दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४
या सोहळ्याची विषयपत्रिका पुढीलप्रमाणे:
➢ श्री शारदा देवीच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन
➢ उपास्तीतांचे स्वागत
➢ मंडळाध्यक्षांचे मनोगत
➢ दिनसशवके प्रकाशन
➢ सत्कार समारंभ
➢ मंडळाच्या कार्यालय निधी संकलन मोहिमेचा पुनः शुभारंभ
➢ आभार प्रदर्शन
➢ अल्पोपहार
या प्रकाशन सोहळ्यास आपण जरूर उपस्थित रहावे ही ववनंती.
आपला नम्र
संतोष सीताराम पंडित
सरचिटणीस, श्री शारदा समाज सेवा मंडळ तुरंबव मुंबई