समस्त तुरंबव ग्रामस्थ बंधू-भगिनी,
सप्रेम नमस्कार,
दरवर्षी प्रमाणे श्री शारदा समाज सेवा मंडळाची २०२६ सालची दिनदर्शिका आपण प्रकाशित करत आहोत.
आपणा सर्वांचे सहकार्य आणि सहभाग यामुळे दिनदर्शिकेतील जाहिरातींसाठी आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल आपले मनापासून आभार.
या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता पुढील ठिकाणी आयोजित केला आहे:
प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृह
२ रा मजला,
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय
शारदा सिनेमा चित्रपटगृहाजवळ
दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे:
• देवी शारदेच्या प्रतिमे समोर
दीप प्रज्वलन
• उपस्थितांचे स्वागत
• दिवंगत ग्रामस्थांना श्रद्धांजली
• अध्यक्षांचे मनोगत
• दिनदर्शिका प्रकाशन
त्यानंतर अल्पोपहार देण्यात येईल, तसेच दिनदर्शिका वाटप करण्यात येईल.
कार्यक्रम वेळेत सुरू करून दुपारी १२ वाजेपर्यंत आटोपण्यात येईल.
या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी जरूर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही आग्रहाची विनंती.
आपला नम्र
प्रमोद अमृतराव पंडित
अध्यक्ष,
श्री शारदा समाज सेवा मंडळ
